Posts

Showing posts from February 26, 2025

मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात.

Image
  मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात. समाजात एकोप्यासह संस्कृतीचे दर्शन, आ. नरेंद्र मेहता यांची प्रमुख उपस्थिती. भाईंदर, (राजू रिकामे) मीरा-भाईंदर गवळी समाज संघटनेच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्यात समाज बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गवळी समाजाच्या एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात लहानग्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी गाणी, नृत्य, विविध कला सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. गवळी समाजाच्या या महत्वपूर्ण सोहळ्याला मीरा-भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता, शिवसेनेच्या शहर संघटक निशा नार्वेकर, १४६ विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर, १४६ विधानसभा महिला अध्यक्ष पूजा आमगावकर, भाजपा मागाठाणे विभाग प्रमुख व गवळी समाजसेवक मदन वाजे, समाजसेवक महेश म्हात्रे, उद्योजक प्रकाश खेडेकर, उद्योजक...