पत्रकार सुरक्षा समिती आयोजित कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 28 फेब्रुवारीला पनवेलमध्ये पत्रकार आणि आजची आव्हाने विषयावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती संपूर्ण कोकण क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पत्रकारांसाठी वर्षातून किमान एकदा तरी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईच्या वतीने "कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025" चे आयोजन शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पनवेल तालुक्यातील धामणी येथील जोशी फार्म येथे आयोजित कारण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नेत्र विशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दैनिक पुण्यनगरीचे संपादक शैलेंद्र शिर्के, दैनिक लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सर्वसामान्य जनता मोठी अपेक्षा ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत असते. आणि खऱ्या अर्थाने पत्...