कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार...

कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार... माणगाव दि. २३ फेब्रुवारी रोजी जनआक्रोश समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली व महामार्गाची परिस्थिती कोकणकरांच्या समोर मांडण्यात आली. मुंबई गोवा महामार्ग संदर्भात जनआक्रोश समितीच्यावतीने पळस्पे ते पोलादपूर महामार्गाची पाहणी करण्यात आली यामध्ये अनेक ठिकाणी शासनाने केलेल्या चुकांची खैर सामान्य जनतेकडून ऐकायला मिळाली. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिलेल्या नवीन डेडलाईन नुसार हा महामार्ग गणेशोत्सव पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले परंतु जनआक्रोश समितीने केलेल्या पाहणी नुसार ही देखील दिलेली एक डेडलाईन आहे. शासनाच्या वतीने सांगण्यात येत असलेला पळस्पे ते कासू हा पहिला टप्पा 98% पूर्ण झाला असून इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे परंतु सदर करण्यात आलेला काम निकृष्ट दर्जाचा असून सहा महिन्यापूर्वी झालेला कामावर पुन्हा खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत मार्गावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन त्यानंतर डिव्हायडर मध्ये वृक्षारोपण साईड पट्टी या गोष्टींचा अद्यापही अभाव दिसून ये...