ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५ च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन

ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५ च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन पनवेल : एम. एम. व्ही. क्रिकेट क्लब धाकटी जुई यांच्या आयोजनाखाली आज छाया रिसॉर्ट मानघर येथे “ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग २०२५” च्या भव्य ऑक्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली. मा. सरपंच श्री.शक्ती बाळकृष्ण म्हात्रे आणि मा. उपसरपंच श्री. मंगेश मधुकर घरत यांच्या पुढाकाराने सदर सोहळ्याचे नियोजन उत्तम रित्या करण्यात आले होते. या लीगमध्ये एकूण 8 गावातील 16 संघ खेळवली जातील. क्रिकेट क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला जास्तीत जास्त मानधन मिळून त्याच्या कलेला भविष्यात प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी आयोजन केले त्याबद्दल त्यांचे शेकापनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन केले. यावेळी यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत श्री. रोशन डाकी (सरपंच), श्री. दर्शन म्हात्रे, श्री. संग्राम घरत, श्री. प्रल्हाद पाटील, श्री. सज्जन नवाळे, श्री. नामदेव केनी, श्री. वसंत नव...