Posts

Showing posts from February 12, 2025

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन

Image
  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडले. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना शुभेच्छा दिल्या.          कोकणातील जिल्हा जरी बदलला असला तरी सुद्धा आपल्या पनवेलमध्ये येऊन सिंधुदुर्ग मधील भाषा आणि परंपरा संघाच्या माध्यमातून आजही सर्व बांधवांनी जपली आहेत आणि त्या जपत असतानाच आपल्या स्थानिक इतर संस्कृती सुद्धा सर्व बांधव जोपासतात हे आज त्यांच्याशी संवाद साधताना प्रकर्षाने जाणवले आणि त्याचे मला समाधानी वाटले. यावेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या सिंधुदुर्ग वासियांचा प्रीतम म्हात्रे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.          याप्रसंगी श्री. गणेश कडू (मा.नगरसेवक), श्री. सर्वगोड साहेब (सा.बां.वि.अधिकारी), डॉ. भगवान बिरमोळे, ओरियन मॉलचे मालक उद्योगपती श्री. मंगेश परूळेकर, श्री. मंगेश अपराज व इतर मान्...