मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.
मौजे ठाकरोली नवतरुण विकास मंडळ मुंबई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न. 29 डिसेंबर या दिवशी आंग्रेवाडी शाळा , गिरगाव या ठिकाणी मा. श्री . जितेश माहाडीक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय श्री. राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली . तसेच कार्यक्रमाला मुंबईकर मंडळाचे पदाधिकारी श्री.सहदेव काप, शांताराम जाधव, प्रकाश जाधव, संतोष विचारे, प्रमोद कापडी, पंकज शिगवण, महेंद्र जाधव, संतोष जाधव, रामदास कापडी, अरविंद खेरटकर,परेश कापडी, कैलास कापडी, सुनिल मौले, शांताराम खेरटकर, संतोष कापडी शैलेश जाधव, नरेंद्र विचारे, तसेच मंडळाचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव महेंद्र जाधव यांनी केल.