कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार...
कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार...
माणगाव दि. २३ फेब्रुवारी रोजी जनआक्रोश समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली व महामार्गाची परिस्थिती कोकणकरांच्या समोर मांडण्यात आली.
मुंबई गोवा महामार्ग संदर्भात जनआक्रोश समितीच्यावतीने पळस्पे ते पोलादपूर महामार्गाची पाहणी करण्यात आली यामध्ये अनेक ठिकाणी शासनाने केलेल्या चुकांची खैर सामान्य जनतेकडून ऐकायला मिळाली.
माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिलेल्या नवीन डेडलाईन नुसार हा महामार्ग गणेशोत्सव पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले परंतु जनआक्रोश समितीने केलेल्या पाहणी नुसार ही देखील दिलेली एक डेडलाईन आहे.
शासनाच्या वतीने सांगण्यात येत असलेला पळस्पे ते कासू हा पहिला टप्पा 98% पूर्ण झाला असून इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे परंतु सदर करण्यात आलेला काम निकृष्ट दर्जाचा असून सहा महिन्यापूर्वी झालेला कामावर पुन्हा खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत मार्गावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन त्यानंतर डिव्हायडर मध्ये वृक्षारोपण साईड पट्टी या गोष्टींचा अद्यापही अभाव दिसून येत आहे तसेच यानंतर दुसऱ्या टप्प्यात जर का आपण आलो तर ह्या टप्प्यामध्ये आमटेम पासून इंदापूर पर्यंत बरेचसे काम बाकी आहे यामध्ये आमटेम ब्रिज, नागोठणे ब्रिज, रातवड ब्रिज,कोलाड ब्रिज,लोणेरे ब्रिज इंदापूर व माणगाव बायपास यांचे काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबत शंका आहे.
माणगाव मधील ट्रॅफिक समस्या अगदी भयंकर आहे यावर वेळोवेळी शासनाकडे मागणी करून देखील यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.तसेच स्थानिकांकडून सुचविण्यात येणाऱ्या पर्यायी मार्गाचा विचार देखील करण्यात येत नाही.
माणगाव मधून दिघी कडे जाणाऱ्या अवजड वाहनाना ठराविक वेळेत माणगाव शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या सर्व बाबींची शासन दखल घेत नसल्याने कोकणकरांच्यावतीने महामार्गांवर शिमगा करण्यात येणार आहे यामध्ये पळस्पे पासून सिंधुदुर्ग पर्यंत एकाच वेळेत महामार्गांवर प्रतिकात्मक होळी लावण्यात येईल तर माणगाव बायपास व संगमेश्वर येथे सरकारच्या डेडलाईनची सार्वजनिक होळी करण्यात येईल, असा ईशारा जनआक्रोश समितीकडून देण्यात आलेला आहे.
आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला जनआक्रोश समितीचे अध्यक्ष श्री.अजय यादव,उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र पवार, सचिव श्री. रुपेश दर्गे, नियोजन प्रमुख श्री. जितेंद्र गिजे,संघटन प्रमुख श्री. विकास निकम,समाजसेवक श्री. अण्णा साबळे, माजी नगराध्यक्ष श्री.ज्ञानदेव पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष रणपिसे,जिल्हा प्रभारी संज्योग मानकर, माणगाव सचिव कु. रमेश ढेबे, श्री. अमित उतेकर व पत्रकार बांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment