हायकल कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
हायकल कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
पनवेल : तोंडरे येथील हायकल कंपनीच्या गेट समोर 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत. कंपनीतील स्क्रॅपचे काम, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम, बॉयलरची राख बाहेर काढण्याचे काम, फोरक्लिप, हायड्रा, ॲम्बुलन्स ई. लागणारी वाहने कंपनीस पुरवण्याचे काम, कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम मिळावे या सर्व कामांमध्ये भूमिपूत्रांना समाविष्ट करावे या मागण्यांसाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण केले जाणार असून याबाबतच्या प्रति तहसील, प्रांत अधिकारी, तळोजा पोलीस स्टेशन, हायकल कंपनी, पोलीस उपायुक्त, पोलीस कमिशनर यांना देण्यात आलेल्या आहेत.
तळोजा एमआयडीसीत हायकल कंपनी ही येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे. या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी 1999 पासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्र व्यवहार देखील करण्यात आले आहेत. 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची माहिती महामंडळाने माहिती दिलेली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मात्र शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. देशाच्या विकासासाठी जमिनी त्याग करणाऱ्या भूमिपुत्र शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकल्पामध्ये दहा ते बारा कुटुंब अवलंबून असताना भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कंपनी स्थापनेकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. गतवर्षी शेतकरी चर्चेसाठी मागणी करत असताना यावेळी शेतकऱ्यांना 50 टक्के स्क्रॅप मध्ये भागीदारी देऊ असे सांगण्यात आले होते मात्र इतर मागण्यांवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 फेब्रुवारी होती सकाळी 11 वाजता हायकल कंपनी गेट समोर शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत.
Comments
Post a Comment