"शिवराज्याभिषेक" सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
"शिवराज्याभिषेक" सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल (प्रतिनिधी) उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "महाराष्ट्राची महासंस्कृती" या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, कोळीगीत, गणगवळणी, लावणी, पालखी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्य रचनांनी मंत्रमुग्ध होतानाच विशेषतः यावेळी सादर झालेला "शिवराज्याभिषेक सोहळा" उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला. त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित या मराठमोळ्या कलाविष्कारातून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांची सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, समितीचे सरचिटणीस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, वैभव देशमुख, भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी सरपंच वसंत म्हात्रे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वसंतशेठ पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, व्ही.के. ठाकूर, रघुनाथ देशमुख, स्वप्नील ठाकूर, राज ठाकूर, पायलट प्राप्ती ठाकूर, कामगारनेते संजय भगत, विभागीय अध्यक्ष विजय घरत, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, वामन म्हात्रे, हेमंत ठाकूर, सि के ठाकूर, रघुनाथ ठाकूर, जयेश ठाकूर, स्नेहलता ठाकूर, कमलाकर देशमुख, सुहास भगत,किशोर पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, मदन पाटील, गणेश जगताप, शैलेश भगत, योगिता भगत, किशोर पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
"शिवराज्याभिषेक सोहळा" हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा, जो ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. या ऐतिहासिक घटनेत महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित "महाराष्ट्राची महासंस्कृती" या कार्यक्रमात "शिवराज्याभिषेक सोहळा" सादर करण्यात आला. या सादरीकरणाद्वारे उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देण्यात आला. महाराष्ट्राची महासंस्कृती ही अनेकविध परंपरा, इतिहास, कला, साहित्य, लोकजीवन आणि चालीरीतींनी समृद्ध आहे. संस्कृती विविधतेने नटलेली असून संतपरंपरा, लोककला आणि आधुनिक विचारसरणीचा प्रभाव कायम राहिला असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्र पुढे नेत आहे, त्यामुळे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रभाव महाराष्ट्रसह देश आणि परदेशातही कायम राहिला आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या रत्नकांत जगताप व सुभाष नकाशे प्रस्तुत "महाराष्ट्राची महासंस्कृती" या कार्यक्रमातून राज्याच्या गौरवशाली परंपरेचा आदर अधोरेखित होत होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक स्मिता गव्हाणकर यांनी केले.
Comments
Post a Comment