सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन

 


सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन

पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडले. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना शुभेच्छा दिल्या. 

        कोकणातील जिल्हा जरी बदलला असला तरी सुद्धा आपल्या पनवेलमध्ये येऊन सिंधुदुर्ग मधील भाषा आणि परंपरा संघाच्या माध्यमातून आजही सर्व बांधवांनी जपली आहेत आणि त्या जपत असतानाच आपल्या स्थानिक इतर संस्कृती सुद्धा सर्व बांधव जोपासतात हे आज त्यांच्याशी संवाद साधताना प्रकर्षाने जाणवले आणि त्याचे मला समाधानी वाटले. यावेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या सिंधुदुर्ग वासियांचा प्रीतम म्हात्रे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

         याप्रसंगी श्री. गणेश कडू (मा.नगरसेवक), श्री. सर्वगोड साहेब (सा.बां.वि.अधिकारी), डॉ. भगवान बिरमोळे, ओरियन मॉलचे मालक उद्योगपती श्री. मंगेश परूळेकर, श्री. मंगेश अपराज व इतर मान्यवर उपस्थित होते.




प्रितमदादा चषक 2025” चे आयोजन

पनवेल : शेतकरी कामगार पक्ष चिरनेर च्या माध्यमातून “प्रितमदादा चषक 2025” चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून सामन्यांचे उद्घाटन केले. 

   शेतकरी कामगार पक्षाची नवीन तरुण पिढी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा पुढाकार घेत आहे हे पाहून प्रीतम म्हात्रे याना समाधान वाटले. याप्रसंगी म्हात्रे यांनी संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष चिरनेर च्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत श्री. सुरेश पाटील (सहचिटणीस शेकाप उरण), श्री. रमाकांत पाटील (मा. पं. स. सदस्य), सौ. शुभांगी ताई पाटील (मा. उपसभापती उरण), श्री. हरेंद्र गावंड (मा. उपसरपंच पिरकोन), श्री चंद्रशेखर पाटील (मा. सरपंच सारडे), श्री. अरुण पाटील, श्री. संजय पाटील, श्री. रविंद्र ठाकूर, श्री. भास्कर ठाकूर, श्री. संदिप गावंड, श्री. गोपीनाथ गोंधळी, श्री. सतीश पाटील, श्री. अनिल पवार उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर