मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
मकर संक्रांत निमित्त ठाकरोली येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
म्हसळा प्रतिनिधी / महेंद्र जाधव
दि. 14 जानेवारी मकर संक्रांत निमित्त तांबडेश्वर महिला मंडळ ठाकरोली यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रत्येक घरातील महिला उपस्थित होत्या.
अनेक वर्षांची परंपरा जतन करत असताना एकरंग एक विचार एकोपा हे चित्र प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. अशी एकजुट असेल तर असे अनेक कार्यक्रम यशस्वी होणार यांत तिळमात्र शंका नाही असे विचार महिला अध्यक्षा यांनी या कार्यक्रमा निमित्त उपस्थित केले.तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या गावच्या कामात सर्वानी हातभार लावा अशा घोषवाक्य यावेळी देण्यात आले. तसेच सर्व महिला मंडळ गळाभेट भेटवस्तू देऊन हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.या कार्यक्रमाला महिला मंडळ सर्व पदाधिकारी यांनी खुप मेहनत घेतली .
Comments
Post a Comment