श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न

श्री शिवगिरी सेवा संस्थानच्या वतीने श्री दत्तजन्मोत्सव उत्साहात संपन्न पनवेल : सुकापुर - देवद येथील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री शिवगिरी सेवा संस्थानचे वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी "श्री दत्तजन्मोत्सव" शनिवार दिनांक १४डिसेंबर२०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. गेली २३ वर्षे सातत्याने संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक अबाल वृध्द भाविक मुंबई,नवी मुंबई,ठाणे,सातारा येथून आले होते. या सोहळ्यासाठी प्रसाद खोत, मिलिंद पांचाळ,मधुकर उर्फ भाई खोत,गिरीश गव्हाणे,संदीप जाधव,राजू खोत, शिवानंद प्रभू, बाळा तोडवळकर,माधुरी मिठबावकर,उदय सावंत,सुभाष खोत आदी साधकांनी खूप मेहनत घेतली.या उत्सवाचे आयोजन प्रसाद खोत यांच्या कल्पकतेने करण्यात आले होते. या प्रसंगी रुखवत स्पर्धा घेण्यात आली यामधे सौ. कविता खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ वैशाली गव्हाणे आणि सौ सुरेखा पाटकर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. या उत्सवातील सर्वात मोठा कार्यक्रम ...