# आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार
# आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार # भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार पनवेल / प्रतिनिधी. नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे.या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांचा शानदार पद्धतीने पण लक्षवेधी अनोखा सत्कार बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी केला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सय्यद अकबर यांच्या राजकारणी आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले....