महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी
महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या अदिती तटकरे तब्बल ११६०५० मतांनी विजयी म्हसळा / प्रतिनिधी एकतर्फी विजय मिळवताना आदिती तटकरे यांनी ८२७९८ मताधिक्य घेत प्रथमतच श्रीवर्धन मतदार संघात इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याचा इतिहासात नोंद झाली आहे. ना भूतो न भविष्यती असा विजय, अब की बार ऐक लाख पार करीत महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील एकमेव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा तब्बल ८२७९८ मतांनी पराभव केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांना ११६०५० मत तर नवगणे यांना अवघी ३३२५२ मत मिळाली आहेत.काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकुर यांना ४०८०,बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी साळवी यांना ७१८, मनसेचे फैजल पोपेरे २१२५,कुणबी समाज नेते बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांना अवघी ४९० मत ...