Posts

Showing posts from November 22, 2024

# ये भावा, कुणाची हवा, कुणाच्या बाजूने लागणार निकाल? बघायला जावा.... # मंत्री अदिती तटकरे यांची "लाडकी बहीण योजने"मुळे इलेक्शनचा "नूर"च बदलला

Image
  # ये भावा, कुणाची हवा, कुणाच्या बाजूने लागणार निकाल? बघायला जावा.... # मंत्री अदिती तटकरे यांची "लाडकी बहीण योजने"मुळे इलेक्शनचा "नूर"च बदलला   रायगड मत@जितेंद्र नटे  आता फक्त काही तासच राहिले आहेत, इतक्या दिवसाची प्रतीक्षा संपणार. राजकारणात पडद्या मागील हालचालीना जबरदस्त वेग आला असून आमदार फुटू नयेत म्हणून आतापासूनच हॉटेल मध्ये उमेदवार डांबून ठेवणार? कारण सरकार बनवायला फक्त हातात 48 तासाच आहेत. त्यामुळे आमदारांची पळवापाळवी होणार. निकाल हा महाराष्ट्रात दोन्ही पक्षासाठी चांगला असेल. मात्र केंद्रात सत्ता भाजपा व घटक पक्षाची असल्यामुळे जास्तीत जास्त कल अपक्षांचा महायुतिबरोबर असेल. अजून महाविकास आघाडीचे आमदारही फोडतील... म्हणजे सरकार महायुती बनविनण्याची शक्यता नाकारता येत नाही? मंत्री अदिती तटकरे यांची "लाडकी बहीण योजने'मुळे इलेक्शनचा "नूर"च बदलला  गेली अडीच वर्ष शिंदे आणि ठाकरे यांच्या कोर्ट मॅटरमुळे जनता कंटाळली होती. त्यामुळे मळवट म्हणजे नर्व्हसनेस महारष्ट्रातील जनतेमध्ये आला होता. मात्र अदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजना आली आणि वातावरणच बदलले. ...

"म्हसळा शहराचे मत"? वाचा सनसनीखेज "रायगड मत" # म्हसळा शहरामध्ये स्वाभिमानी हिंदुने केले तटकरेंनाच मतदान # अनिल नवगणे दिवसभर म्हसळा येथे षड्डू ठोकून का होते? आणि मोहल्यातच का होते? तटकरेंची मते फोडली तर नाही ना? म्हसळा/जितेंद्र नटे

Image
  "म्हसळा शहराचे मत"? वाचा सनसनीखेज "रायगड मत" # म्हसळा शहरामध्ये स्वाभिमानी हिंदुने केले तटकरेंनाच मतदान  # अनिल नवगणे दिवसभर म्हसळा येथे षड्डू ठोकून का होते? आणि मोहल्यातच का होते? तटकरेंची मते फोडली तर नाही ना?  म्हसळा/जितेंद्र नटे  श्रीवर्धन मतदार संघांचे विजयाचे रहस्य म्हणजे म्हसळा तालुका होय. रोहा जन्मभूमी तर म्हसळा कर्मभूमी असे तटकरे भाषणात नेहमी सांगत असतात. म्हसळा शहरामध्ये एकूण 7621 मतदान आहे. त्यापैकी फक्त 4405 मतदान झाले. म्हणजे 3216 मतदारांनी मतदान केलेले नाही. म्हणजे सरासरी 57टक्के मतदान झाले. तटकरे हे मोदी यांच्यासोबत महायुतीत गेल्यामुळे हिंदू मतदारांनी त्यांना मतदान केले तर इतर समाजाने त्यांना मतदान केले नाही. हे लोकसभेच्या इलेक्शनलासुद्धा पाहिलेले होते. त्याच धर्तीवर विधानसभेला मतदारांचा कौल दिसून आला. अगोदर एकतर्फी निवडणूक होणार? असे वाटत असताना अचानक शिवसेनेचे अनिल नवगणे तुतारी वाजवत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि रातोरात म्हसळ्याच्या राजकारणात "खळबळ" माजली. विधानसभेला 20 तारखेला शहरामध्ये 4405 मतदान झाले, शहरामध्ये 40 टक्के हिंदू म...