माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा -जे एम म्हात्रे

माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा -जे एम म्हात्रे उरण : मतदार संघात समाजाच्या सेवेचे यथाशक्ती काम करताना समाजसेवेचा हा रथ असाच पुढे चालविण्यासाठी मी माझा मुलगा प्रितम तुमच्या हवाली करत आहे, त्याला तुम्ही विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन जे एम म्हाञे यानी मोहोपाडा येथे भव्य जाहीर सभेत केले. उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे शेकाप उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे याच्या निवबणूक प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा आमदार भाई जयंत पाटील, मराठा महासंघाचे विनोद साबळे, नारायणशेठ घरत, रमाकांत म्हाञे, जितेंद्र म्हाञे, उत्तमराव गायकवाड, शिवाजी काले , राजाराम पाटील, सचीन ताडफले, महेश साळुंखे, मनोहर पाटील, जगदिश पवार, अनिल ढवले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जे एम म्हाञे म्हणाले की गेली दहा वर्षात उरण विधानसभेत शेकापचा आमदार नसल्याने मतदार संघात रस्ते, पाणी व इतर अनेक समस्या नागरिकाना भेडसावत आहे. माञ य...