Posts

Showing posts from November 15, 2024

# अब की बार मतदान 1 लाख पार, अदिती तटकरे यांचा प्रचाराचा जबदस्त झंझावात... # तब्बल 5 तालूके - गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांची भेट घेतली. # लोकांचे भरभरून भेटत असणारे प्रेम पाहून पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला # यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस अशी निवडणूक आहे.

Image
  # अब की बार मतदान 1 लाख पार, अदिती तटकरे यांचा प्रचाराचा जबदस्त झंझावात... # तब्बल 5 तालूके - गाववाड्या काढल्या पिंजून, प्रत्यक्ष लोकांची भेट घेतली. # लोकांचे भरभरून भेटत असणारे प्रेम पाहून पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला # यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस अशी निवडणूक आहे. म्हसळा / जितेंद्र नटे  गेली 15 वर्षे जी विकासकामे केली गेली आहेत त्या विकासकामांना पाहून जनता भरभरून मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त करत असताना यंदाची विधानसभा निवडणूक ही विकासाचे व्हिजन विरुद्ध कुठे आश्वासनांचा पाऊस? अशी निवडणूक आहे. महायुती सरकारने केवळ आश्वासने न देता आपल्या कर्तृत्वातून आपलं व्हिजन सिद्ध केलं आहे. महायुतीच्या धोरणांवर विश्वास ठेवत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिक पुन्हा एकदा मला भरभरून आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे.  याच विश्वासाने 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील बागमांडला पंचायत समिती गणातील मौजे निगडी काठी, निगडी मोहल्ला, निगडी गौळवाडी, सायगाव गौळवाडी, सायगाव, काळींजे, वावेलवाडी, बागमांडले येथे नागरिकांसोबत संवाद

# शरद पवार म्हसळ्यात येणार...अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित # लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे

Image
  # शरद पवार म्हसळ्यात येणार...अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित  # लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे श्रीवर्धन/प्रतिनिधी  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हसळा (म्हसळा-बोर्ली पंचतन रस्ता) येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेसाठी गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुका अध्यक्ष अजहर धनसे यांनी दिली आहे.        सभेच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.महाविकास आघाडी तर्फे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा मिळाली असून महाविकास आघाडीतर्फे अनिल नवगणे यांना उमेदवारी मिळाली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने आता प्रचाराला चांग

आज प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये सभेचे आयोजन, माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार

Image
  आज प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये सभेचे आयोजन, माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार  उरण / प्रतिनिधी  महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी ६ ते १० या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये माजी आमदार भाई जयंत पाटील यांची तोफ धडाडणार आहे. या सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आले आहे.        उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. प्रीतम म्हात्रे यांना गावागावातून, शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरण शहराचा विकास हवा असेल तर प्रीतम म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे आहे. प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातून, बीजेपीतून शेतकरी कामगार पक्षात पक्ष प्रवेश केला जात आहे. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे. शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी प्रीतम जे एम म्ह

# रायगड विकासाची गाथा लिहणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी # पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी # लोकनेते दि. बा. पाटील यांचे त्याग व परिश्रम महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ऊर्जा - पंतप्रधान नरेंद्र मोदी # रायगड सोबत माझे भावात्मक आत्मिक संबंध -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
  # रायगड विकासाची गाथा लिहणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी  # पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी # लोकनेते दि. बा. पाटील यांचे त्याग व परिश्रम महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ऊर्जा - पंतप्रधान नरेंद्र मोदी # रायगड सोबत माझे भावात्मक आत्मिक संबंध -पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल (हरेश साठे) विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पाच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहणार आहे. आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असे, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खारघर येथे केले.  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्षाचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण (डोंबिवली), आमदार संजय केळकर (ठाणे शहर), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), आमदार गणेश नाईक (ऐरोली), आमदार महेश बालदी (उरण), आमदार मंदा म्हात्रे (बेलापूर), आमदार रवीशेठ पाटील (पेण), आमदार महेंद्र थोरवे (कर्जत) यांच्या प्रचारार्थ झालेल्या विजय संकल्प सभेला मार्गदर्श