Posts

Showing posts from November 7, 2024

महाविकास आघाडी एकत्रितपणे आता प्रचारात उतरली असल्याने शिट्टीला विजय निश्‍चित मिळणार ः बाळाराम पाटील

Image
  महाविकास आघाडी एकत्रितपणे आता प्रचारात उतरली असल्याने शिट्टीला विजय निश्‍चित मिळणार ः बाळाराम पाटील पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः महाविकास आघाडी आता पूर्णपणे एकदिलाने व एकत्रितपणे प्रचारात उतरली असून आज शिट्टीचा विजय निश्‍चित झाल्याचे प्रतिपादन 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी संदर्भात माहिती देताना सांगितले.  या बैठकीला उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासह काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख विश्‍वास पेटकर, उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, मा.नगरसेविका निर्मला म्हात्रे, एम.पी.यादव, अनिल नाईक, फारुक पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये आमचे थोडे फार मतभेद असले तरी वरिष्ठ पातळीवर हे मतभेद मिटविले जातील व शिट्टी विजयी होेईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. खारघर, कामोठे, पनव

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा चांगला प्रतिसाद

Image
  माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा चांगला प्रतिसाद पनवेल : महविकास आघडीचे लाडके उमेदवार मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचा पनवेल शहर (प्रभाग क्रमांक १४,१८,१९) प्रचार दौरा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.या प्रचार दौऱ्याला परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक,महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.          दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयाला अभिवादन करून करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर शहरातील मिरची गल्ली, कोळीवाडा, रोहिदास वाडा, पंचरत्न-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढपुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष पंजाब हॉटेल, मारुती मंदिर, आदर्श हॉटेल, गावदेवी पाडा, कांदेचे घर, रीची रीच दुकान, जयभारत नाका, सावरकर चौक, प्रताप नगर, बिर्मोळे हॉस्पिटल, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल,वाल्मिकी नगर,बावन बंगलो,नवीन तहसील कॉर्नर, साईनगर,विट सेंटर, वाजी मोहल्ला, पटेल मोहल्ला, भारत नगर, भुसार मोहल्ला, कच्छी मोहल्ला, जामा मशीद या ठिकाणी प्

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा

Image
  महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा पनवेल: महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. बाळाराम पाटील यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे.       आम आदमी पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 रायगड जिल्हा करता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला बिनशर्पात ठिंबा दिला असल्याचे पत्र डाॅ. रियाझ पठाण - प्रदेश संघटन मंत्री - महाराष्ट्र राज्य, यांनी दिला आहे. यावेळी ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे, समन्वयक- पनवेल विधानसभा, चिमाजी शिंदे - संघटन मंत्री - पनवेल विधानसभा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर्फे बाळाराम पाटील हे निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर चळवळीतील इतर सहकारी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे.

पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा.*

Image
  पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा पनवेल/ प्रतिनिधी  युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमामधील निवासीं सोबत केक कापून संगीतमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.  अग्रगण्य पध्दतीने समाजाचे समाजासमोर प्रतिबिंब मांडण्याचे काम दिपाली ताई पारसकर करत आहेत.आणि आम्हा सर्व पत्रकारांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. - पत्रकार दीपक घोसाळकर. वृध्दाश्रम मध्ये वाढदिवस साजरा केला पाहिजे त्यामुळे येथील निवासिना आनंद मिळतो. - पत्रकार सनिप कलोते . दिपाली पारसकर समाजसेवा आणि पत्रकारीतेमध्ये सर्वगुणसंपन्न आहेत. समाजसेवक यशवंत बिडये. यावेळी पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय भोईर, पत्रकार रत्नाकर पाटील , पत्रकार सुधीर पाटील , पत्रकार सुभाष वाघपंजे , पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार सनिप कलोते, पत्रकार सुनील वारगडा , खुशी एंटरप्राजेसचे संचालक अजय दुबे, समाजसेवक यशवंत बिडये यशकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा

उरण विधानसभेत हवा, प्रितमदादा आमदार नवा, उरण विधानसभेचा नव्या आमदाराचा इतिहास पुन्हा घडणार

Image
  उरण विधानसभेत हवा, प्रितमदादा आमदार नवा, उरण विधानसभेचा नव्या आमदाराचा इतिहास पुन्हा घडणार उरण : स्वातंत्र्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही तो राखण्यासाठी नव्या उमेदीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या निवडणूकीत शेकापचे युवा नेते कार्यकुशल व धडाडीचे प्रितमदादा जनार्दन(जेएम) म्हात्रे यांना निवडून येणार आहेत. त्यामुळे उरण विधानसभा निवडणुकीत तरुणांना प्रितमदादांच्या रूपाने नवा आमदार हवा आहे. असे मत मतदारसंघातील मतदार व्यक्त करीत आहेत.         उरण विधानसभेचे नेतृत्व शेकापचे जेष्ठ नेते माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील, माजी विरोधी पक्षनेते दत्ता पाटील,माजी आमदार दत्तूशेठ पाटील, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील,माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी लढणाऱ्या वीरांचा मतदारसंघ आहे. ज्या १९८१ च्या सिडको विरोधी आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या साथीने जासई नाक्यावर आपलं रक्त सांडणारे व 1984 च्या ऐतिहासिक उरण शेतकरी आंदोलनाचे नेते सुप्रसिद्ध उद्योजक व शेकापचे जेष्ठ नेते जे.

महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी

Image
  महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी पनवेल : अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे महेश बालदी याना दिला आहे. यापूर्वी अखिल आगरी समाज परिषद यांनी देखील महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली होती.        अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, काही लोकांच्या आशिर्वादाने सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आतापर्यंत आगरी समाजाबद्दल जी विधाने केलीत, त्यांतून आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले, त्यानांच कमी लेखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही वारंवार केला आहात. "ही काही आगरी समाजाच्या संघटनेची निवडणूक नाही." या विधानातून तुमचा समाजाला एकप्रकारे कस्पटासमान लेखण्याचा इरादा दिसून आला आहे. अशा प्रकारे सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा महेश बालदी