Posts

Showing posts from November 5, 2024

जे. एम. म्हात्रे कुटुंबीयांची पत्रकारांसोबत दिवाळी

Image
  जे. एम. म्हात्रे कुटुंबीयांची पत्रकारांसोबत दिवाळी उरण : समाजामध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी २४ तास निःस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. उरण, पनवेल, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईमधील पत्रकार योग्यतेने काम करत आहेत. पत्रकारांनी समजहितासाठी काम करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकारांप्रति आदर, प्रेम बाळगत व एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.     २ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रंजना बंगला, जे. एम. म्हात्रे यांच्या कोपर गाव येथील निवासस्थानी पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत केले. या प्रसंगी जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते नारायण घरत यांनीही पत्रकारांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारां

लढणार आणि जिंकणार-प्रितम जनार्दन म्हात्रे

Image
  लढणार आणि जिंकणार-प्रितम जनार्दन म्हात्रे पनवेल/प्रतिनिधी:उरणची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा असा दावा शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केला आहे.        कार्यकर्ते ही शेकापची ताकद आहे. त्यांच्या निष्ठेने पक्ष वाढत असतो.आम्ही त्यांच्या इच्छेनुसार चालतो. या ठिकाणी स्थानिकांना कमी लेखण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांना जागा दाखवून देण्यासाठी आम्हाला लढणे आवश्यक आहे. शेकाप हा नेहमी संघर्ष करून यश संपादन करत असतो. पक्षाला चळवळीचा वारसा आहे. एकनिष्ठेचा लाल बावटा हाती घेऊन कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला प्रत्यक्षरूप येण्यासाठी ही निवडणूक लढणे आवश्यक आहे आणि ती जिंकणे सुद्धा अत्यावश्यक आहे असे मत शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त करून राजकीय वावड्यांना पूर्ण विराम दिला.