Posts

Showing posts from October 28, 2024

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

Image
  # श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.  रायगड मत / जितेंद्र नटे  raigadmat.page  रायगड मध्ये शिवसेना (उबाटा) चे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे उद्या फॉर्म भरणा. श्रीवर्धन मतदार संघात चर्चेला एकच उधाण. रायगड दक्षिण शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे पदाचा राजीनामा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून श्रीवर्धन मतदार संघातून तुतारी वाजविणार . राज्यात सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रायगड जिल्ह्यात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांच्या आशिर्वादाने विजयाचा शंखनाद करण्यात आला

Image
युवा निर्धार विजयी मेळाव्यात विजयाचा शंखनाद पनवेल (प्रतिनिधी)  कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांच्या आशिर्वादाने विजयाचा शंखनाद करण्यात आला.   पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या मेळाव्याला हजारोच्या संख्येने युवक आणि युवती उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने उत्कृष्ट नियोजनात हा मेळावा भूतो न भविष्यतो असा होता.         माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील,गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा प्रमुख व जिल्हा चिटणीस सरचिट

आज वसुबारस दिवाळी सणाचा पहिल्या दिवशी सोमवार सकाळी 9.30 वाजता, २८ ऑक्टोबरला महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर अर्ज दाखल करणार

Image
  आज वसुबारस दिवाळी सणाचा पहिल्या दिवशी सोमवार सकाळी 9.30 वाजता, २८ ऑक्टोबरला महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर अर्ज दाखल करणार   पनवेल(प्रतिनिधी)  १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत.         तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.           राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते.

वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी.

Image
  वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते.वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी.  विशेष लेख@रायगड मत  आज सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी, दिवाळीची वसुबारसने सुरवात होत आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरी करण्यात येते. वसुबारसनिमित्त आपल्या प्रियजणांना हटके शुभेच्छा पाठवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी २८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते २९ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदया तिथीनुसार २८ आक्टोबर रोजी, सोमवारी वसुबारस साजरी होईल. दिवाळीची पहिली पणती सोमवारी २८ ऑक्टोबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे.  वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वसुबारस हा सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात, समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मात