हरीहरेश्वर हिट अँन्ड रन प्रकरणातील आठ फरार आरोपी अद्यापही पोलिसांना सापडता सापडत नाहीत .. घटनेचा पर्यटन व्यावसायिकांनी घेतला धसका
हरीहरेश्वर हिट अँन्ड रन प्रकरणातील आठ फरार आरोपी अद्यापही पोलिसांना सापडता सापडत नाहीत .. घटनेचा पर्यटन व्यावसायिकांनी घेतला धसका. श्रीवर्धन / मंगेश निंबरे हरीहरेश्वर येथिल ममता स्टे होम येथे २० आक्टों २०२४ च्या मध्य रात्री दिड वाजताच्या सुमारास पुणे येथून आलेले मदधुंद पर्यटकांनी वाद करून निष्पाप महिला ज्योती धामणस्कर यांना गाडी खाली चिरडून जिवे मारले मात्र त्या घटनेतील तिन आरोपी श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र आठ आरोपीं अद्याप ही पोलिसांना सापडलेले नाहीत तर आरोपीकडे असलेली स्कार्पिओ गाडी पोलिसांना पुण्यात सापडली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे मात्र अन्य आठ आरोपींचा सुगावा पोलिसांना अजून लागलेला नाही . घडलेल्या घक्कादायक घटनेमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असून स्थानिक व्यवसाईकां मध्ये संभ्रप निर्माण होऊन भीतीचे वातावाण निर्माण झाले आहे .हरीहरेश्वर दक्षिण काशी ओळख असलेल्या ठिकाणी संरक्षण म्हणून पोलिस चौकी बंद असून ती चालू करण्याची मागणी नागरीक करीत आहेत . श्रीवर्धन दिवेआगर हरीहरेश्वर हि पर्यटन स्थळ असून पर्यटन व्यावसायिकांच्या मनात भितीचे वातावरण निर