Posts

Showing posts from October 14, 2024

रायगड मत - संपादकीय : # भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात... # आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली. # सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे. # उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट

Image
  रायगड मत - संपादकीय  संपादक - जितेंद्र नटे  raigamat.page # भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात... # आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला काम दिले. नोकरीं मिळवून दिली. # सद्याची वाढती महागाई, बेरोजगारी, फसवे आश्वास, वाढती गुन्हेगारी हे सर्व पाहता लोक महायुतीला कंटाळली आहे. # उरण विधानसभा आमदार कोण? वाचा "रायगड मत"" सर्व्हे रिपोर्ट  लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. लोकसभा इलेक्शनला शेकाप, श

कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी! ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड.

Image
  कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी! ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड. उरण / विठ्ठल ममताबादे जगातील १६० देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या बहुराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन १२ ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोको येथे सुरु आहे. दिनांक १३ ऑक्टोबर रोजी या बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारत देशातून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची एक्सिक्युटीव्ह मेंबर पदी निवड करण्यात आली.जिथे भारतीयांना प्रतिनिधीत्व मिळत नव्हते तिथे आपल्या नेतृत्व कौशल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भारतीयांचा झेंडा रोवला.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरानातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विविध कामगार संघटनाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक धार्मिक आदी विविध क्षेत्रातून विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

मोहोपाड्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याला प्रचंड उस्फुर्त असा प्रतिसाद

Image
  मोहोपाड्यामध्ये भव्य रोजगार मेळाव्याला प्रचंड उस्फुर्त असा प्रतिसाद रसायनी / प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पनवेल व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी  जनता विद्यालय मोहोपाडा ,रसायनी, पनवेल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम गणपती आणि सरस्वतीला वंदन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे व लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्य्क्ष श्री. एस. जी चव्हाण, डिस्ट्रिक्टचे जीएसटी चेअरपर्सन ला. विजय गणत्रा आणि डिस्ट्रिक्टचे युथ एम्पॉवरमेंटचे ला. नयन कवले , एनआयपीएम चे अध्यक्ष श्री. किशोर शेळके व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत करण्यात आले.  या रोजगार मेळाव्यामध्ये ३५० उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ६५ मुलांना शॉर्टलिस्ट केले आहे. आणि १५ ते २० मुलांना लगेचच कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. लायन्स क्लब