Posts

Showing posts from October 11, 2024

# मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा, ता.माणगांव जि.रायगड येथे संपन्न झाला. # २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू

Image
  # मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा, ता.माणगांव जि.रायगड येथे संपन्न झाला. # २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू # सोहळा महिला सशक्तीकरणाचा.. सोहळा सरकारच्या वचनपूर्तीचा !! माणगाव / प्रतिनिधी  मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय "वचनपूर्ती सोहळा" मोर्बा (ता.माणगांव जि.रायगड) येथे संपन्न झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २ कोटी ४४ लाख बहिणींची नोंदणी झाली असून, २ कोटी ३० लाख भगिनींना लाभ हस्तांतरित झाला आहे. महिलांना स्वावलंबी व सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात १०००० पिंक ई-रिक्षा सुरू करण्यात येत आहेत. कुटुंबात व समाजात स्त्रियांना समान दर्जा मिळवून देण्यासाठी बालकांच्या नावात आईचे नाव बंधन करण्याच

पनवेलमध्ये मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन**

Image
  * पनवेलमध्ये मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन** पनवेल: WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन आणि अंत्योदय फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु नानक दरबार गुरुद्वारा, न्यू पनवेल येथे काल मोफत वैद्यकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून गरजू लोकांना कोणत्याही भाड्याशिवाय आणि फक्त जमानत रक्कम भरून वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रात ३१ उपकरणांचा समावेश असून, त्यात ३ व्हील चेअर्स, ५ कमोड चेअर्स, १० फोल्डेबल वॉकर, १० चार पायांच्या काठ्या आणि ३ फिंगर एक्सरसाईझरचा समावेश आहे. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित उद्घाटन सोहळ्यात WE क्लबच्या प्रमुख सदस्यांनी आणि अंत्योदय फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी श्री मेहता जी आणि श्री बरोडिया जी ह्याने उपस्थिती लावली होती. गुरुद्वारा समितीचे सदस्य श्री हरविंदर सिंग जी, श्री प्रद्युम्न सिंग जी, श्री जगदीश सिंग जी ह्यांचे ही या कार्यक्रमाला मोलाचे योगदान होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पनवेल परिसरातील कोणत्याही समाजातील गरजू व्यक्तींना मदत मिळणार आहे. या उपक्रमासाठी पनवेल गुरुद्वारा ने त्यांची जागा व सेवा उ

शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार २०२४ व उत्कृष्ट महिला बचत गटाचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे पार पडला

Image
  शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार २०२४ व उत्कृष्ट महिला बचत गटाचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे पार पडला  पनवेल : प्रमुख पाहुणे राजश्री बाळाराम पाटील व ममता प्रीतम म्हात्रे आणि प्रिती शेळके दुर्गा वायदंडे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे सन्मानचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार योगिनी वैदू कर्नाटकी, समाजसेविका सुमेधा लिम्हण, वृद्ध सेविका संगीता नितीन जोशी मा. नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, समाजसेविका नुरजहा कुरेशी डॉक्टर बिना काबरा, समाजसेविका दीक्षा दिलीप जाधव, सुकापुर सरपंच योगिता राजेश पाटील, गायिका निकिता मिलिंद म्हात्रे समाजसेविका अलका कोळी तोडणकर यांना नवदुर्गा पुरस्कार बाळू शेठ पाटील सोशल वेल्फर ट्रस्ट व द्वारकादास श्याम कुमार कडून प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट महिला बचत गटासाठी छत्रपती ग्रामसंघ विचुंबे, रयत महिला ग्रामसंघ शिवकर, हिरकणी महिला बचत गट उलवे, श्री दत्त महिला बचत गट रिटघर, राजे संभाजी ग्रामसंघ प

नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार? # लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली

Image
  नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार? # लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली मुंबई :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज (शुक्रवार, ११ ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. नवी मुंबई विमानतळाच्या पूर्णपणे तयार झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायूदलाचं सी-२९५ हे विमान उतरलं. हे लढाऊ विमान विमानतळ व नवी मुंबईच्या आकाशात काही वेळ घिरट्या घेत होतं. त्यानंतर धावट्टीवर यशस्वीरित्या उतरलं. धावपट्टीच्या बाजूने पाण्याचे फवारे उडवून या विमानाला मानवंदना देखील देण्यात आली. २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विमानतळावरील धावपट्टीची तपासणी करण्यासाठी लँडिंग सर

रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच गोरेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

Image
रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच गोरेगाव या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मुंबई / प्रतिनिधी  या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने रायगड मी मराठी प्रतिष्ठान ( रजि.) च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. O६ ऑक्टोबर २०२४ रोजी, आय. बी. पटेल स्कुल, गोरेगाव (प), या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्सपूर्द सहभाग लाभला. सामाजातील अनेक प्रतिष्ठान, संस्था आणि मंडळ यांनी देखील सहभाग घेऊन रक्तदान केले. तसेच विविध क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, राजकीय मंडळी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावून रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात १५८ विक्रमी रक्त बॅगची नोंद झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. आदेश संदेश लाड यांनी या शिबिरात सहकार्य करणाऱ्या बोरिवली ब्लड बँक, मान्यवर, ग्रामस्थ, प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच सामाजिक संस्था यांचे आभार मानले.  रायगड मी मराठी प्रतिष्ठान ही संस्था अनेक समपयोगी काम करत असते. जवळ जवळ हजारोच्यावर स्वयंसेवक या संघटनेत काम करीत असतात. त्याचा गोरगरीब जनतेला होतं असतो.

भाई अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण

Image
  भाई अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलकाचे अनावरण म्हसळा / जितेंद्र नटे म्हसळा - खारगाव खुर्द सकलप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गाव कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या फलकाचे अनावरण मा. आम. श्री अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळीं जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, वरवठणे गण उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष विजय लोणशिकर, खजिनदार मनोहर पाटील, वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नुकतेच या गावच्या सकलप कोंड गवळी वाडी आणि खारगावखुर्द सकलप ग्रामस्थांनी पक्षाला जाहीर पाठींबा देऊन कोकणचे भाग्यविधाते सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष् प्रवेश केला होता. त्यामुळे संपूर्ण गाव आता राष्ट्रवादीमय झाला आहे. गेली अनेक वर्षे ही गाववाडी विकासापासून वंचित होत्या. मात्र तटकरे साहेब यांनी विशेष निधी देऊन या गावात विकासकामे टाकली आहेत. या होणाऱ्या विकास कामामुळे आम्ही सर्वजण तटकरे साहेब यांना जाहीर पाठिम्बा देत आहोत असे यावेळी सांगण्यात आले. नवीन कमिटी स्थापन करून त्यांना शुभेच्या देण्यात आल्या. म्हसळा तालुक्यातील गाव