Posts

Showing posts from October 9, 2024

श्रीवर्धन मतदार संघातील घराणेशाही संपुष्टात आणणार - कृष्णा कोबनाक. # विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराज सेनेचा श्रीवर्धन तालुक्यात संवाद दौरा.

Image
#  श्रीवर्धन मतदार संघातील घराणेशाही संपुष्टात आणणार - कृष्णा कोबनाक. # विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराज सेनेचा श्रीवर्धन तालुक्यात संवाद दौरा. श्रीवर्धन / राजू रिकामे) येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा अभिप्राय मिळविण्यासाठी बळीराज सेना पक्षा मार्फत विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद दौऱ्यानिमित गावोगावी भेटी देत असताना श्रीवर्धन मधील आजवर सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी मतदारांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे असे वक्तव्य बळीराज सेना महाराष्ट्र प्रदेश उपाधक्ष कृष्णा कोबनाक यांनी जनसंवाद दौऱ्यानिमित श्रीवर्धन येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधला. येणाऱ्या काळात पंधरा वर्ष चाललेल्या विकास कामांच्या गप्पांना पूर्णविराम देणे गरजेचे आहे श्रीवर्धन मतदार संघात घराणेशाहीचा डंका वाजत आहे. मतदाराला मतदानाचा अधिकार दिला त्याचा योग्य वापर करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी योग्य उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे. २२ एप्रिल २०२३ बळीराज सेनेची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. मानवता, समता, स्वातंत्र्, बंधुता व न्याय हि राष्ट्रहिताची तसेच लोककल्याण कारी विचारधारा

पुणे येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

Image
  पुणे येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न पुणे / प्रतिनिधी पुणे येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरवादी नेते तथा कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील ॲड.राहुलजी मखरे (माजी राष्ट्रीय महासचिव बी.एम.पी) यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षित कार्यकर्त्यांसह जाहीररीत्या पक्ष प्रवेश केला.  आंबेडकरवादी नेते ॲड.राहुलजी मखरे गेल्या 35 वर्षापासून शिव फुले शाहू आंबेडकर विचार बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत तसेच सक्रिय समाजकारणासोबत सक्रिय राजकारणामध्ये देखील राष्ट्रीय स्तरावरती बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव पदावरती देशभरामध्ये बहुजनांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी संघर्ष करत होते.  ॲड.राहुलजी मखरे यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) यांना आगामी विधानसभा, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे. ॲड.राहुलजी मखरे यांच्या नेतृत्वामध्ये व मा.संतोषभाई घरत (प्रदेश सरचिटणीस