Posts

Showing posts from October 7, 2024

म्हसळा येथे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय महिला व बालकल्याण मंत्री, आदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले

Image
  म्हसळा येथे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय महिला व बालकल्याण मंत्री, आदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले  म्हसळा/प्रतिनिधी  आज म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय महिला व बालकल्याण मंत्री, आदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले  या उपक्रमांतर्गत अशा विद्यार्थ्यांना सायकली वितरित केल्या गेल्या. ज्या विद्यार्थ्यांची शाळा दोन किंवा दोन पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर आहेत त्यांची अडचण लक्षात घेता हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल आहे, ज्यामुळे त्यांचा शाळेत जाण्याचा वेळ व श्रम वाचणार आहे.कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्रमुख कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताईंनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि

नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने अबोली महिला रिक्षा संघटनेच्या महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

Image
  नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने  अबोली महिला रिक्षा संघटनेच्या महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न पनवेल/प्रतिनिधी अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत हे महिला सदस्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. रिक्षा चालक महिला आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते हे लक्षात घेवून नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या सहकार्याने रिक्षा चालक महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन नवीन पनवेल येथे करण्यात आले होते. यामध्ये डोळे तपासणी बरोबरच ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी अशा चाचण्या करण्यात आल्या. या शिबीराचा लाभ 30 महिला रिक्षा चालकांनी घेतला. सदर शिबीर नवदृष्टी आय केअर सेंटर येथे घेण्यात आले. या शिबीरासाठी या हॉस्पीटलचे मुख्य डॉ. संतोष कुमार नायर, डॉ. विजयश्री पाटील, डॉ. निकीता भोसले, डॉ. अश्‍वथी पोनोली यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिलांना डोळयांच्या समस्या भेडसावत असतील तर आर्थिक दुर्बल महिलांसाठी मोफत ऑपरेशनही करण्यात येईल असे यावेळी डॉ. संतोष नायर यांनी सांगितले. या शिबीराला अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्या व पदाधिकारी उपस्थित

म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड गवळी वाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश # गावच्या विकासासाठी तटकरेंच्या विकास रथात सामील होण्याचा घेतला ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय

Image
  https://youtu.be/90r_3yGa7QY?si=SYRK5x_eQ_SSglJr म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड गवळी वाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश गावच्या विकासासाठी तटकरेंच्या विकास रथात सामील होण्याचा घेतला ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय रायगड मत / अंगद कांबळे म्हसळा तालुक्यात सध्या राजकीय उलथापालथीला जोर आला असून शिवसेना उबाठा गट आणि इतर पक्षांतील अनेक गावांनी रायगडचे खासदर सुनिल तटकरे महाराष्ट्र राज्य महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मा आमदार भाई अनिकेत तटकरे यांच्या विकास कामाचा धडाका पाहता त्यांच्या कार्य प्रणालीवर विश्श्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच तालुक्यांतील सकलप कोंड गवळी वाडी स्थानिक, मुंबई मंडळ व महिला मंडळ यां ग्रामस्थांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. गेली 10 वर्ष आम्ही गावच्या विकास कामांपासून वंचित होतो, त्यामुळे गावात अनेक विकास कामे रखडली होती. तालुक्यात अनेक गावांनी आपला विकास केला मात्र आम्ही त्यापासून दूर रा