Posts

Showing posts from October 5, 2024

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे साहेब यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त सस्नेह निमंत्रण .....

Image
  https://youtu.be/r5BlrUk5g2k?si=5-GVDR8iOR-M7MXL दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे साहेब यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त सस्नेह निमंत्रण ..... रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे साहेब यांची ६८ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. तरी सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपली विश्वासू  श्रुती शाम म्हात्रे https://youtu.be/r5BlrUk5g2k?si=5-GVDR8iOR-M7MXL

चॅम्पियन्स कराटे क्लब आयोजित निमंत्रितांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न... म्हसळा प्रतिनिधी: संतोष उध्दरकर.

Image
  चॅम्पियन्स कराटे क्लब आयोजित निमंत्रितांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न... म्हसळा प्रतिनिधी: संतोष उध्दरकर. म्हसळा:श्रीवर्धन येथे कुलकर्णी सभागृह येथे चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड ,पुणे,ठाणे,मुंबई,सातारा,सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील साधरण २०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.चॅम्पियन्स कराटे क्लब चे संस्थापक गुरू संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शन खाली होणाऱ्या   स्पर्धेसाठी डॉ.मधुकर ढवळे सर,नॅशनल हॉली बॉल प्लेअर अजित मापुस्कर तसेच ऍड. संतोष साप्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संस्थेच्या साऊथ एशियन गोल्ड मेडलिष्ट कुमार प्रसाद अवघडे यांचा सत्कार देखील करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटा मधील अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, रायगड जिल्ह्यामधुन खेळणाऱ्या कुमार विक्रांत खांडेकर,विहान विचारे, रूजुला यवतकर,मृदूनी जोशी यांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिनियर गटामधुन कुमार शंतनु जाधव, साक्षी तांदळेकर ह

# शालेय विद्यार्थिनी यांच्या साठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन # श्री रविप्रभा मित्र संस्था, पंचापत समिती म्हसळा व चॅम्पियन कराटे क्लब यांचा संयुक्त उपक्रम

Image
  # शालेय विद्यार्थिनी यांच्या साठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन  # श्री रविप्रभा मित्र संस्था, पंचापत समिती म्हसळा व चॅम्पियन कराटे क्लब यांचा संयुक्त उपक्रम म्हसळा प्रतिनिधी / संतोष उध्दरकर म्हसळा: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लहान मुलींचे लैगिक शोषण, तरुणी व महिला यांच्या वर होणारे वाढते अत्याचार पाहता श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या विषेश प्रयत्नाने व चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन, म्हसळा यांच्या पुढाकाराने तसेच पंचायत समिती, म्हसळा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शालेय विद्यार्थीनी यांच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करून रायगड जिल्हयात तसेच म्हसळा तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम घेत असल्याने तालुक्यात संस्थेचे व पंचायत समितीचे तसेच चॅम्पियन कराटे क्लबचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या उपक्रमाला ७ ऑक्टो ते १७ ऑक्टो असे १० दिवसाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम मराठी शाळा न.१, पाभरा, खरसई, नेवरुळ ईथे याचे आयोजन करून मुलींना सक्षम बनवुन या सर्व शालेय मुलींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात

नैना प्रकल्पाच्या दोन फेज चे उद्घाटनाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या प्रशासनाला गाळावा लागला दिवसभर घाम अखेरीस उद्घाटनाचे घोडं गंगेत न्हालं पनवेल/ प्रतिनिधी

Image
  नैना प्रकल्पाच्या दोन फेज चे उद्घाटनाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या  प्रशासनाला गाळावा लागला दिवसभर घाम  अखेरीस उद्घाटनाचे घोडं गंगेत न्हालं पनवेल/ प्रतिनिधी         शेतकऱ्यांच्या उरावर नैना प्रकल्प बसविण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारी करता विकासाचे आभासी चित्र निर्माण करण्यात शिंदे फडणवीस यांची महायुती दंग झाली आहे. याच प्रयत्नात नैना (Navi Mumbai airport influence notified area) प्रकल्पातील नगर नियोजन योजना क्रमांक २ ते ७ यांमधील ३० मीटर, ४५ मीटर आणि ६० मीटर अशा वेगवेगळ्या रुंदीचे १७.५९ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (५ ऑक्टोबर) होणार होते. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हा प्रकल्प उभा राहणार आहे त्यांचा विरोध आणि त्यांनी घेतलेल्या हजारो हरकती यांच्यावर कुठलीही भूमिका न घेता केवळ उद्घाटनाचा घाट घालणाऱ्या प्रशासनाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.       याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन फेजचे उद्घा

उरण विधानसभेत शेकापची प्रचारात आघाडी!* 6 ऑक्टोबरला पदाधिकारी पदनियुक्ती मेळावा

Image
  उरण विधानसभेत शेकापची प्रचारात आघाडी! 6 ऑक्टोबरला पदाधिकारी पदनियुक्ती मेळावा   उरण :  महाराष्ट्र मध्ये लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा परिस्थितीत आपण निवडून येणारच अशा ठिकाणी विविध पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.        रायगड मधील उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत होणार आहे. यावेळी आपला पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडी कडून उरण मधून शेतकरी कामगार पक्षालाच तिकीट मिळेल या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा क्षेत्रात कंबर कसली आहे.        गणपती मध्ये लोकांच्या भेटीसाठी घेण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उरणचे विधानसभेचे उमेदवार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच आज शेतकरी कामगार पक्षाला नवचैतन्य निर्माण झाले आहे. खालापूर, पनवेल आणि उरण या तिन्ही तालुक्यांमध्ये येणाऱ्या गावांमध्ये भेटी देण्यात प्रितम म्हात्रे आघाडीवर आहेत

खारघर मधील तरुणांचा शेकाप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश

Image
खारघर मधील तरुणांचा शेकाप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.  पनवेल /प्रतिनिधी.        महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आणि महाविकास आघाडीला लोकांची पसंती वाढत चालल्यामुळे खारघर मधील अल्पसंख्याक समुदायाचे आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली साकिब खान, रशीफ  खान, बिलाल मंसूरी, जावेद खान, आसिफ मुकादम, अब्दुल कलाम,अब्दुल सलाम आदींच्या बरोबरीने शेकडो मुस्लिम युवकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्षात जाहीरपणे प्रवेश केला.         हा पक्ष प्रवेश करण्यासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवेंद्र मढवी, खारघर चे समाजसेवक बिलाल पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आसिफ खान यांनी सांगितले आमचे गेल्या दहा वर्षात खूप नुकसान झाले. याच कारणामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेश करत आहोत. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले आज आपण जो पक्ष प्रवेश केला आहे तो किती

रायगड नंदिनी उपर,तन्मय पाटील आणि गणेश तोटे राज्य बेंचप्रेस स्पर्धेत विजेते

Image
  रायगड नंदिनी उपर,तन्मय पाटील आणि गणेश तोटे राज्य बेंचप्रेस स्पर्धेत विजेते मुंबई : वडाळा येथे दिनांक 28 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यस्तरीय बँक प्रेस क्लासिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सब ज्युनिअर मुलींच्या स्पर्धेत नंदिनी ऊपर बॉडी लाईन जिम खोपोली ही सब जुनियर क्लासिक स्ट्रॉंग वुमन या किताबाची मानकरी झाली. जूनियर क्लासिक स्ट्रॉंग मॅन हा किताब संसारे जिम यांचा तन्मय पाटील झाला तर सीनियर इक्विप गट स्पर्धेत 105 किलो वजनी गटाच्या गणेश तोटे फिटनेस आणि पनवेल विजेता झाला याच पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला दोन सांघिक विजेतेपद पुरुष ज्युनिअर आणि महिला ज्युनिअर प्राप्त झाली तसेच क्लासिक स्पर्धेत सीनियर आणि मास्टर पुरुषांचे उपविजेतेपद मिळाले आहे याबद्दल पावर लिफ्टिंग अध्यक्ष गिरीश वेधक यांनी पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद व्यक्त केला. आणि खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. या स्पर्धेत रायगड पावर लिफ्टिंग चे संघ प्रशिक्षक म्हणून अरुण पाटकर यांची आणि संघ व्यवस्थापक म्हणून सुभाष टेंबे यांची निवड झाली होती. सहाय्यक म्हणून संदीप कृष्णा पाटकर यांना जबाबदारी दिली होती. या स्पर्धेत