Posts

Showing posts from October 3, 2024

दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव

Image
 https://youtu.be/04YR6sW4SdY?si=qhcIPQtq2CoVC1rV दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव  पनवेल :         १८८ पनवेल विधानसभा मतदार संघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. प्रसिद्ध यादीतील ८५ हजारांहून अधिक नावे दुबार आणि बोगस असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शेकाप चे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडी चे वतीने सन्माननीय उच्च न्यायालयात या दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात धाव घेतली आहे.पनवेलच्या शेतकरी कामगार पक्ष कार्यालयामध्ये बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांना याबाबत अवगत केले. यावेळी त्यांच्या समवेत पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना सल्लागार बबन दादा पाटील, शेकाप नेते तथा उद्योजक जे एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, शेकापचे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू आदी मान्यवर उपस्थित होते.        माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नि