Posts

Showing posts from September 16, 2024

मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए ! रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख

Image
  मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर एक बुंद खून,इंसानं की जान बचाने के लिए ! रक्तदान करा, जीवनदान करा ! अनिसा शेख  नवी मुंबई/साबीर शेख:- ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती  जगाला सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचं प्रतीक असणाऱे हजरत मोहंमद पैगंबर त्यांनी  दिलेला समता-बंधुत्व-प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करणारा ठरावा म्हणून जगभरात लोकोपयोगी ,मानव कल्याणकारी अनेक अभिनव उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविले जातात. त्याचप्रमाणे तळोजा फेज 1 सेक्टर 2 येथील मदरसा ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी " सर्वश्रेष्ठ दान रक्तदान " या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी केला.रक्तदात्यांच्या स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरत असल्याने यावेळी त्यांचे सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अल्पसंख्याक नेत्या सुलताना चांद बीबी वंशज ज्येष्ठ समाजसेविका अनिशा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले व सर्वांना ईद ए मिलाद च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आयोजक म्हणून अफरोझ भाई