उरण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट )तर्फे विधानसभा लढविण्यास संतोष घरत इच्छुक.
उरण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट )तर्फे विधानसभा लढविण्यास संतोष घरत इच्छुक. # पक्षश्रेष्ठी कडे केला अर्ज सुपूर्द # शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती उरण/प्रतिनिधी उरण विधान सभा मतदार संघातील स्वच्छ चारित्र्य संपन्न नेतृत्व म्हणून जनता कामगार नेते संतोष घरत यांच्याकडे पाहते. शिवाय उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र असल्याने स्थानिक नागरिक म्हणून उरण तालुक्यातील व उरण विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी संतोष घरत यांच्या नावाला पसंती दिली आहे.संतोष रोहिदास घरत यांनी उरण विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा आहे. जनतेचे हित लक्षात घेऊन व समाजसेवा देशसेवा करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच राजकारणाच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने येणारी उरण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत यांनी घेतला आहे.त्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल