Posts

Showing posts from August 23, 2024

पॉवरलिफ्टिंग,राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

Image
# पॉवरलिफ्टिंग,राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना मुंबई : दिनांक 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा -२०२४, कोलकत्ता-पश्चिम बंगाल या ठिकाणी सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे  महिला गट - १)४७ किलो-काजल भाकरे ठाणे. २)४७ किलो -हर्षदा घोले ,मुंबई उपनगर, ३)६३ किलो सेजल मकवाना मुंबई उपनगर. ४)६३ किलो अदिती सांगळे, ठाणे. ५)६९ किलो अक्षया शेडगे नवी मुंबई. ६)६९ किलो प्रेरणा साळवी ,ठाणे. ७)८४ किलो आश्लेषा गुडेकर मुंबई उपनगर. ८)८४+ मृणाली भोग,पुणे पुरुष गट- १) ५९ किलो धर्मेंद्र यादव मुंबई २)५९ किलो नीरजकुमार यादव मुंबई उपनगर ३)६६ किलो वेंकटेश कोणार,मुंबई उपनगर ४)६६ किलो साहिल उतेकर मुंबई ५)१०५ किलो ऋतुराज पाटील कोल्हापूर ६)१०५ किलो अश्विन सोळंकी मुंबई ७)१२० किलो जितेंद्र राणे,मुंबई उपनगर ८)१२० किलो अजिंक्य पडवणकर, मुंबई. संघप्रमुख-संजय सरदेसाई  संघ व्यवस्थापक-विजय पाटील पुणे  प्रशिक्षक- सूर्यकांत गर्दे व अनंत चाळके, मुंबई.  आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात पाॅवरलिफ्टिंग खेळातील खेळाडूंना व खेळाला प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती. आपला,  संजय सर

बदलापूर मध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये जन आक्रोश आंदोलन, शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी शासनाचा घेतला खरपूस समाचार

Image
  बदलापूर मध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये जन आक्रोश आंदोलन, शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी शासनाचा घेतला खरपूस समाचार पनवेल :  देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून महिलांच्या हत्या असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटना विरोधात तीव्र संताप निर्माण झाले आहे. देशात व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे उरण शहरातील बाझारपेठ येथील गांधी चौकात दुपारी १२ वाजता जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.      बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली.  बदलापूर परिसरात जनता रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन चिघळलं. त्यामुळे