यशश्री शिंदे हत्या प्रकरणी सकल हिंदू समाज- श्रीवर्धन तर्फे आक्रोश मोर्चा.*
*यशश्री शिंदे हत्या प्रकरणी सकल हिंदू समाज- श्रीवर्धन तर्फे आक्रोश मोर्चा.* श्रीवर्धन / राजू रिकामे; यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करून क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज श्रीवर्धन मध्येही उमटले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावीत या मागणी करिता व क्रूर निघृण हत्या करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रीवर्धनमधील सकल हिंदू समाज-श्रीवर्धन, यांच्या कडून सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सोमजाई मंदिर प्रांगण मधून टिळक रोड मार्गे शिवाजी महाराज चौक मधून वाणी आळी ते श्रीवर्धन पोलीस ठाणे पर्यंत भव्य निषेध मोर्चा आयोजीत करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी यशश्री शिंदे या तरुणीचा अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या महाराष्टातील व जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निषेध नोंदवत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज श्रीवर्धन तर्फे श्