Posts

Showing posts from August 1, 2024

# दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे* # अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या"

Image
  # दाऊदला भर चौकात फाशी द्या- प्रितम म्हात्रे*  # अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्या"      पनवेल : तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यशश्री शिंदे च्या कुटुंबीयांची आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करतानाच आरोपीला फक्त फाशीच नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही अशा प्रकारची तीव्र शब्दात भावना त्यांनी व्यक्त केली.     रविवारी उरण मधील नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात ते सहभागी झाले होते. सदर गंभीर विषयात बोलताना त्यांनी सांगितले अशा प्रकारचे घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजची तरुण पिढी नशेच्या अधीन झाली आहे. उरण-पनवेल परिसरा

राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त

Image
# राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग"चे रौप्य पदक रायगडचे महेश कृष्णा पाटील यांना प्राप्त  मुंबई : राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा (४०/५०/६०/७० वर्षावरील स्पर्धक) पावर लिफ्टिंग इंडिया मान्यतेने नुकतीच इंदौर (मध्य प्रदेश) येथे 21 जुलै 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत पार पडली.   या स्पर्धेत मास्टर 1 (40वर्षावरील.,) स्पर्धेच्या 59किलो पुरुष वजनी गटात "महेश सविता कृष्णा पाटील"या स्पर्धकाने 427.5 किलो वजन उचलून द्वितीय क्रमांकाचा रौप्य पदक पटकावले आहे. स्कॉट प्रकारात त्यांनी 170 किलो, बेंच प्रेस प्रकारात 80 किलो आणि डेडलीफ्ट प्रकारात 177.5 असे वजन घेतले. त्यामुळे त्यांना व बेंचप्रेस प्रकारात रौप्यपदक आणि डेडलीफ्ट  प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले त्यांना या स्पर्धेची एकूण चार  पदक प्राप्त झाले आहेत .यापूर्वी सुद्धा त्यांनी जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा पदक प्राप्त केलेले आहे. खालापूर तालुक्यातील आपटी  (डोनवत) गावचे रहिवासी असलेले महेश पाटील यांच्या रौप्य पदकाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन यांनी आनंद