०४ ऑगस्टला 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'
०४ ऑगस्टला 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर पनवेल (प्रतिनिधी) अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०४ ऑगस्ट रोजी 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'चे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गर्दर्शनाखाली दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदा हे १६ वे महाशिबीर आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, तसेच नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविणे, अशा विविध आरोग्य तपासण्यांसह, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार देण्यात येणार आहे. त्या