कु. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा..
कु. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बीएमटीसी कामगारांचा ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा.. उरण @रायगड मत बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २८ जुलै रोजी खांदा कॉलनीत बीएमटीसी बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समितीच्या अध्यक्षा श्रुती श्याम म्हात्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यातील काही कामगारांचा मृत्यू झाला आहे तर काही कामगारांचे वय ६० पेक्षा अधिक झाले आहे. बीएमटीसी मधील माजी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येकी दहा बाय दहा चौरसफूटांचे भूखंड वितरित करण्याबाबत सिडकोमध्ये ठराव झालेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी लवकरात लवकर सिडकोने करावी अशी मागणी बीएमटीसी कर्मचाऱ्यांनी केली आहे. बीएमटीसी १९८४ साली बंद झाली. त्यावेळी कार्यरत असलेल्या १८०० कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी, नुकसान भरपाई व कायदेशीर देणी देणे सिडकोवर बंधनकारक होते. मात्र सिडकोने ह