Posts

Showing posts from July 26, 2024

म्हसळयात अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजाआड.

Image
म्हसळयात अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजाआड. म्हसळा / प्रतिनिधी  तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलगी रस्त्याने चालत जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपीने पीडितेचा हात पकडुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची घटना घडली आहे.घटनेची फिर्याद पिडीतीने म्हसळा पोलिस ठाण्यात दिली असता पोलीसांनी आरोपी माज मुजीब तालिब वय वर्षे १९ रा.वरवठणे याच्या मुस्क्या आवळून गजाआड केले .आरोपी माज मुजीब तालिब याचेवर म्हसळा पोलिस ठाण्यात कॉ.गुन्हा रजिस्टर नंबर ७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७५ सह लैंगीक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमचे कलम ८,१२ प्रमाणे (पास्को ॲक्ट अन्वये) नोंद करण्यात आला.सदरचा गुन्हा सालविंडे रस्त्यावरील पुलावर दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता घडला असल्याचे सांगण्यात आले. आरोपी माज याचेवर अशा प्रकारचा हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून म्हसळा पोलिस ठाण्याचे स.पोलीस निरिक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी व कर्मचारी पोलिस यांनी आरोपीवर लागलीच कडक  कारवाई केली असल्याने तालुक्यात नागरिकांकडून पोसासांचे कौतुक होत आहे.