Posts

Showing posts from July 18, 2024

आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर"

Image
  आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची अमृता"सर्वोत्तम बेस्ट लिफ्टर" मुंबई : साऊथ आफ्रिका येथे ०५ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत या दरम्यान आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रायगडची शेलू वांगणीची रहिवासी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत हिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटात स्पॉट प्रकारापेक्षा 122.5 किलो वजन, बेन प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडली प्रकारात 132.5 किलो वजन घेतले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर "एशियन बेस्ट लिफ्टर"हा किताब सुद्धा प्राप्त केला. अमृता भगत ची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतीआणि तिने पदकांची परंपरा कायम राखली यासाठी रायगडचे माजी राष्ट्रीय खेळाडू माधव गोविंद पंडित यांनी आनंद व्यक्त केला. अमृता भगतीला खोपोली मधील विक्रांत अनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पावर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा प

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट

Image
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट पनवेल : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फेआयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची सदिच्छा भेट घेऊन कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ-  *राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे साहेब,*  *राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष भाई घरत* नुरा,शेख सर  जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महासचिव संजय घरत, महासचिव सतीश चिंडालिया, तसेच सिद्धार्थ मोहिते व संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.