Posts

Showing posts from July 4, 2024

सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच"

Image
सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच" शिवडी- वडाळा मुंबई येथील"ज्ञानेश्वर महाविद्यालय" येते 29 ते 30 जून 2024 या कालावधीत सीनियर पॉवर लिफ्टिंग राज्य स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून नामवंत सिनियर पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेत पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक उत्तम धुरी (मुंबई), द्वितीय क्रमांक विजय कांबळे (कोल्हापूर) आणि तृतीय क्रमांक अंकुश सावंत (मुंबई) यांना देण्यात आला.  महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, मधुकर पाटकर सर(शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि माजी पोलीस अधिकारी रक्षा महाराव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू# "शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा

Image
  खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू "शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा"       पनवेल : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता. हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.     त्यावर कार्यवाही म्हणून त्वरित उलवे परिसरातील पाण्याची समस्या आणि इतर सिडकोची अपुरी विकास कामे यासंदर्भात समस्या निवारणासाठी त्यांनी रायगड भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यातून सकारात्मक निर्णय झाले त्यावर त्यांना त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार सिडको ने कार्यवाही केली आहे. बामणडोंगरी आणि खार...