Posts

Showing posts from June 21, 2024

उरणकरांचा वाघ हरपला # राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे आकस्मिक निधन

Image
  उरणकरांचा वाघ हरपला  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे आकस्मिक निधन  उरण / विठ्ठल ममताबादे  उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे भूमिपुत्र डॅशिंग नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाळकृष्ण पाटील (५६)यांचे गुरुवार दि २० जुन २०२४ रोजी हृदय विकारच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले असून,उरण पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा नवीमुंबई परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील रायगड जिल्हा महाविकास आघाडीने आयोजित करण्यात आलेल्या उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्यात अचानकपणे प्रशांत पाटील यांना प्रकृती खालावल्याचे जाणवताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तात्काळ नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.उपचार घेत असतांनाच त्यांचा रक्तदाब जोमाने वाढल्याने त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक

"एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"

Image
  "एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"  पनवेल / प्रतिनिधी  जून रोजी वटपौर्णिमा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. घरामध्ये पूजन करते वेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला .              भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर रोपटे विविध ठिकाणी महिलांना भेट दिले.