विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन"
https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9 विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन" भविष्यात आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.- प्रितम जनार्दन म्हात्रे, - अध्यक्ष , जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था. पनवेल : "विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे" पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युट