Posts

Showing posts from June 14, 2024

सकाळी सकाळी ऑफिसला जात असताना इंद्रधानुषाचे दर्शन झाले. पनवेल करंजाडे जवळील हायवे वरून जात असताना इंधनुषाचे सुंदर चित्र पाहण्याचे अहो भाग्य मिळाले. त्याचेच हे फोटो आणि व्हिडीओ आपल्यासाठी share करत आहोत. पहा आनंद घ्या आणि पुढे पाठवा. खूप लकी भाग्याचा असतो हा क्षण. फोटो - रायगड मत (जितेंद्र नटे)

Image

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन केले हस्तगत ; दोन आरोपी घेतले ताब्यात

Image
  राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन केले हस्तगत ; दोन आरोपी घेतले ताब्यात पनवेल,  (संजय कदम) ः राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किंमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले. तसेच याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पनवेल, जि. रायगड या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. 40, तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार आहे. त्यानुसार डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम,