Posts

Showing posts from June 13, 2024

# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर # पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन # पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं # सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Image
# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर  # पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन  # पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं # सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते करंजाडे / जितेंद्र नटे  @रायगड मत  सद्या पावसाळा जरी सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा अजूनही सुरुळीत नाही. जवळ जवळ दीड लाख लोकवस्ती असणाऱ्या करंजाडेला अनेक समस्या आहेत. मात्र पाणी जास्त पुरवठा होत नाही किंवा काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. इलेक्शन जरी संपले असले तरी कार्यसम्राट आमदार महेश बालदी काही अराम करण्याचे नाव घेत नाहीत. खासदार श्रीरंग बारणे यांना जिंकवण्यासाठी त्यांनी जंग जंग पच्छाडले होते. उरण मतदार संघात त्यांना अजून काम करायचे आहेत. उरणकरांचे पांग फेडण्यासाठी ते रात्रीचा दिवस करीत आहेत. म्हणूनच गुरुवार दि 13/06/24 रोजी दुपारी ठीक 2:30 वाजता माननीय आमदार श्री महेशशेठ बालदी यांनी सिडकोचे M D व पाणीपुरवठा अधिक

करंजाडे येथे कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने नालेसफाईचे काम जोरात सुरु

Image
करंजाडे येथे कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने नालेसफाईचे काम जोरात सुरु  पनवेल / जितेंद्र नटे  सद्या पावसाला जोरदार जरी सुरुवात झाली नसली तरी, विकासकामाना मात्र जोरदार सुरुवात झाली आहे. सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर असणारे करंजाडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांनी जेसीबी आणि इतर साधनाच्या माध्यमातून नालेसफाई करून घेतली. त्यामुळे नाले तुंबून रस्ता भरण्याचे टेन्शन सद्या नसणार असल्याने करंजाडेकर खूष आहेत. ग्रामपंचायत करंजाडे ही अनेक विकास कामासोबत जनतेची काळजी घेणारी ग्रामपंचायत म्हटल्यास वावगे ठरु नये. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने आणि आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून करण्यात आली आहेत. पाण्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत.  प्रत्यक्ष जनतेमधे जाऊन काम करणे हे सरपंच मंगेश शेलार यांचे वैशिष्ट्ये आहेत. नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या इलेक्शन साठी त्यांनी अफाट मेहनत घेतली व श्रीरंग बारणे यांना विजयी केले. मात्र ते सर्व यशाचे श्रेय आपल्या सोबत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देतात. अशा आदर्श सरपंचांचा वाढदिवस

# मुंबई ते श्रीवर्धन फक्त 2.5 (अढीच) तासात, अरे वावा वा, अरे वा वा # चाकरमाण्यासाठी Good News! खुशखबर, आता गावाला जायचे बोटीने # पर्यटक वाढणार, पर्यटन धंदा वाढणार, रो रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल रायगड मत / जितेंद्र नटे

Image
  # मुंबई ते श्रीवर्धन फक्त 2.5 (अढीच) तासात, अरे वावा वा, अरे वा वा  # चाकरमाण्यासाठी Good News! खुशखबर, आता गावाला जायचे बोटीने # पर्यटक वाढणार, पर्यटन धंदा वाढणार, रो रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल रायगड मत / जितेंद्र नटे  मुंबई/श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथेही रो रो जेटीचे बांधकाम करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणे आता होणार सोपे, मुंबई भाऊचा धक्का ते मांडवा रो रो अलिबाग जलसेवेच्या धर्तीवर मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. "कोविड काळात काशिद येथील जेटीचे काम रखडले होते. मात्र आता ते मार्गी लागले आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. जेटीची व वाहनतळाची उर्वरीत कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील. पुढील वर्षापासून काशिदपर्यंत रो रो सेवा सुरू करता येऊ शकते. दिघी येथील जेटीचे कामही लवकरच सुरू होईल." - सुधीर देवरे, मुख्य कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड  सागरमाला योजने अंतर्गत भाऊचा धक्का ते श्रीवर्धन ता