Posts

Showing posts from June 5, 2024

# श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला # घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी # विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा...

Image
  # श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला # घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी  # विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा. .. रायगड मत  पनवेल / जितेंद्र नटे  मावळचा खासदार कोण होणार? याबाबत उत्सुकता लागून होती. पिंपरी- मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस दिसून येत होती, परंतु महायुतीच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला आहे. बारणे यांनी चिंचवड, पनवेल, आणि पिंपरी विधानसभा मदारसंघातून मोठी आघाडी घेत विजयश्री खेचून आणला आहे. संजोग वाघेरे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतून मतदारसंघातून त्यांना पिछाडी भेटली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून वाघेरे यांना चांगले मतदान भेटले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये देखील भरणे आघाडीवर राहिले. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर श्रीरंग

# राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे # लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले # इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले # मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी # मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार ### 32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी

Image
  # राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे # लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले # इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले # मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी # मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार 32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी रायगड मत / जितेंद्र नटे 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 29 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण 10 लाख 13 हजार 272 मतांपैकी उमेदवारनिहाय  मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. 1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 425568 मते 2) श्री.सु