Posts

Showing posts from April 25, 2024

मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर पनवेल रायगड मत / प्रतिनिधी

Image
  मावळ लोकसभा मतदारसंघात AIFB कडून कामगार नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी जाहीर पनवेल  रायगड मत / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून कामगार नेते शिवाजीराव जाधव हे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजीराव जाधव यांना AIFB व्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष यांच्यासह मावळा संघटना, महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती, क्रांतिसूर्य सोशल फाऊंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाऊंडेशन यांचा पाठिंबा मिळाला असून, या सर्वांच्या सहकार्याने आपण 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलून परिवर्तन घडवून आणू असा विश्वास शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केला. पनवेल येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजीराव जाधव यांनी स्पष्ट केले की त्यांचा लढा हा बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील असमान संधी आणि दुरावस्थेविरोधात असून त्यांच्यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक ही निवडणूक नसून एका सर्वव्यापी आंदोलनाची सुरूवात आहे. या आंदोलनात मावळ मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी सर्वशक्तीनिशी स्वतःची ताकद आणि अस्तित्व

कामोठे वासियांचा पाठिंबा संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळेल - शेकाप नेते प्रमोद भगत यांचे परखड मत

Image
  कामोठे वासियांचा पाठिंबा संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळेल  - शेकाप नेते प्रमोद भगत यांचे परखड मत          सामान्य माणसांचे प्रश्न दिल्लीमध्ये जाऊन मांडण्याची कुवत असणारे संजोग वाघेरे पाटील हेच कामोठेवासीयांची पहिली पसंती ठरतील असे परखड मत शेकाप नेते प्रमोद भगत यांनी मांडले.विद्यमान खासदारांना एक-दोन कार्यक्रमातील उपस्थिती व्यतिरिक्त कामोठेवासीयांनी पाहिलेले नाही. तसेच त्यांनी कामोठेवासीयांचा कुठलाही प्रश्न धसास लावलेला नसल्यामुळे येथील जनतेचा त्यांच्यावर रोष असल्याचे रोखठोक मत प्रमोद भगत यांनी मांडले.         शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रमोद भगत यांनी पनवेल पंचायत समितीचे सभापतीपदी विशेष लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे. त्यानंतर हा भूभाग महानगरपालिकेत अंतर्भूत झाल्यानंतर त्यांनी येथून नगरसेवक पद देखील भूषविले आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा नियोजन मंडळावर त्यांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याची छाप उमटवली आहे. तूर्तास माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा समितीवर ते कार्यरत असून कामोठेवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेत असतात.           आमच

शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा स्वाद

Image
  शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा स्वाद पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी पिंपरी येथे दाखल करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातून आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत घरातून आणलेल्या भाजी, भाकरी तसेच मिरचीच्या ठेच्याच्या आस्वाद घेतला. या प्रकाराकडे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले गेले. शेकापच्या राजकीय वर्तुळात प्रीतम म्हात्रे यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून बघितले जात आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते हे पद भूषवताना शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील नव्या-जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विचारांची सांगड घालून प्रीतम म्हात्रे यांची पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. शेकापने आजवर अनेक मोर्चे, आंदोलने केली आहेत. यानिमित्त येणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या नाश्ता, पाण्याची सोय केली जाते. सुकट-भाकरी, मिरचीचा ठेचा असा या वेळी बेत