Posts

Showing posts from April 11, 2024

नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस #कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर

Image
  नवी मुंबईतील अनेक डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजले 'तीन तेरा' - अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर  पनवेल, नवी मुंबई परिसरातील डान्सबारमध्ये चालत असलेला धांगडधिंगा हा सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभरात गाजत असल्याचे दिसत आहे. या परिसरात तर अनेक डान्सबार मध्ये रात्री उशीरापर्यंत अश्लील व समाजविघातक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आलेले असून येथील डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुलींचा धुडगूस सुरू असल्याचे दिसत आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 'तीन तेरा' वाजले असल्याची संतप्त प्रतिक्रीया प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संगम, मूड, सेल्फी, बेला, सावली, अक्षय, बेवाच, मनिष, ब्लुस्टार, धनराज, बाबा पॅलेस, मॅग्नेट, सैराट, एस. बी. बार या डान्सबारमध्ये अल्पवयीन बांग्लादेशीय मुली दिसून आलेल्या आहेत. बांग्लादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या या बांग्लादेशीय मुली भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारतीय नागरिकत्वाची बोगस कागदपत्रे मिळवून बेकाय

रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन

Image
  रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे पनवेल तालुका पोलिसांचे आवाहन पनवेल,  (संजय कदम) ः रमजान ईद सण शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या मशिदी ट्रस्टी व मौलाना यांच्या बैठकीत करण्यात आले. रमजान ईद सणानिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मस्जिद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रमजान ईद सण हा शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा., सण साजरा करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी., लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने आचारसंहितेचा अधिसूचनाचा भंग/उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला गोपनीय विभागाचे कुंवर, पंकज शिंदे यांच्यासह मशिदी ट्रस्टी व मौलाना आदी उपस्थित होते. फोटो ः पनवेल तालुका पोलीस बैठक

आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च

Image
आगामी लोकसभा व सण उत्सव शांततेत पार पडावा या अनुषंगाने श्रीवर्धन शहरातून पोलिसांचा रूट मार्च * श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी / राजू रिकामे  लोकसभा निवडणुक, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी  सण उत्सवा निमीत्त श्रीवर्धन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवार दि.१० श्रीवर्धन शहरातून श्रीवर्धन पोलिसांनी रुट मार्च काढला होता.                   पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक मुघळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती रुट मार्च दरम्यान पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी दिली.                                                   श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वच सण आणि उत्सव हे गुण्या गोविंदाने तसेच शांततेत पार पडतात. श्रीवर्धन मधील जनता ही सर्वधर्मसमभाव मानणारे व एकोपा जोपासणारी अशी आहे. सर