Posts

Showing posts from April 8, 2024

सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार # रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत म्हणजे पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्व

Image
  सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे मानले आभार पनवेल / वार्ताहर): पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडको आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगर पालिका त्यांना कायम करण्याच्या मनस्थीतीमध्ये नाही. या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाला रायगड पनवेलने वाचा फोडली त्याबद्दल सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले.             येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची अनेक प्रश्न व मागण्या प्रलंबित आहेत. या संबंधात ते शासनाकडे पाठपुरावा सुद्धा करत आहेत. परंतु शासन दरबारी योग्य न्याय मिळत नाही आहे. याबाबत रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांनी त्यांच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न व मागण्या मांडल्या त्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांनी संपादक संतोष भगत यांचे आभार मानले आहेत . यावेळी सा. वार्तांकनचे संपादक संतोष सुतार उपस्थित होते. फोटो: संपादक संतोष भगत सत्कार

शहर पोलिसांची धडक कारवाई; ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट

Image
  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल  शहर पोलिसांची धडक कारवाई; ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु केली नष्ट पनवेल (संजय कदम) :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय वेनपुरे, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अवैध धंदयावर कारवाई करत ७५०० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारु नष्ट केली.   पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि (प्रशा) प्रविण भगत, पोउपनि अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार है अवैध धंदयावरील कारवाईकामी पोलीस ठाणे ह‌द्दीत गस्त करित असताना कुंदेवाहळ गावच्या ह‌द्दीतील जंगलात रोशन वास्कर हा दारु विक्रीसाठी माळण्याचा व बनिवण्याचा धंदा करीत असल्याचे माहित पडले. या अनुषंगाने पंचासह जावून सदर ठिकाणी छापा टाकला असता २५० लिटरचे २२ प्लास्टीकचे पूर्ण भरलेले बैरल मध्ये एकूण १,१०,०००/- रु किमतीचे ७५०० लिटर कच्च्या दारुचे नवसागर द्वव्य तसेच दारु बनविण

आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे

Image
  आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे पनवेल ः आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला जो सन्मानाची वागणूक देईल त्याचबरोबर आम्ही ठाम राहू, असे मत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे व रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संयोजक यांना पत्र पाठवलेले आहे त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याचप्रमाणे आगामी विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका यामध्ये उमेदवारी मध्ये आम्हाला जो वाटा देईल त्याच पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन प्रचार करणार आहोत.  या संदर्भात चर्चा करण्याकरता त्यांनी दोन्ही महायुती व महाविकास आघाडीचे संयोजकांना पत्र पाठवलेले आहेत . त्याचप्रमाणे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष