Posts

Showing posts from April 5, 2024

रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.

Image
  # रायगडचे पॉवरलिफ्टर बबन बाबू झोरे (कर्जत) आणि गणेश संजय तोटे (तक्का -पनवेल) राष्ट्रीय स्पर्धेत जाणार.   रायगड मत / प्रतिनिधी  क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा हैदराबाद येथे "दिनांक 08 ते 12 एप्रिल 2024" या कालावधीत होईल. लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियम, बशीर बाग,नेम्पली रेल्वे स्टेशन जवळ ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत150 च्या वर पुरुष आणि 100 चे वर महिला खेळाडू सहभागी होतील असे समजते. महाराष्ट्राच्या संघात रायगडचे बबन बाबू झोरे,59 किलो वजनी गट (वाघेश्वर- कर्जत, जी व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे, 105 किलो वजनी गट (फिटनेस ऑन जिम, तक्का-पनवेल) यांची निवड झाली आहे. त्यांचे निवडीबाबत बबन झोरे यांना जीव्हीआर फिटनेस चे संचालक विनोद येवले (कर्जत)आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार ( फिटनेस ऑन जिम,संचालक, पनवेल) आणि त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे (भांडुप -मुंबई)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून रा

श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते

Image
  श्रीवर्धनच्या इंडिया आघाडी च्या जनसंवाद मेळाव्यात अनंत गीते यांचा तटकरेंवर घणाघात. मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना मी हद्दपार करणार होतो . - अनंत गीते  श्रीवर्धन / रायगड मत   मागच्याच निवडणुकित २०१९ ला या सुनिल तटकरेना या रायगड च्या राजकारणातून मी हद्दपार करणार होते . शंभर टक्के हद्दपार करणार होतो परंतू त्यांची हद्दपारी वाचवविली कुणी ? त्यांची हद्दपारी शेकापच्या जयंतभाई पाटलांनी वाचविली आणि हे हद्दपारी करण्याच पाप जयंत भाईनी केले म्हणून त्यांनी जयंतभाई पाटलांच्याच पाटीत खंजीर खुपसला . फक्त त्यांनी जयंत भाईंच्या पाटीत खंजीर खुपसला नव्हे तर ज्यांनी राजकारणात जन्म दिला त्या बॅ ए आर अंतुले साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . त्यानंतर ज्या शरद पवार साहेबांनी मोठ केलं त्या शरद पवार साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसला . आता नंबर कुणाचा आहे ? असा मार्मिक सवाल त्यांनी केला . मग अशा विश्वास घातक्याला . लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का ? जो कोणाचा झाला नाही तो तुमचा होईल का ? म्हणून आता १९ ची हद्दपारी वाचलेली २०२४ ला अनंत गीते रायगडाच्या राजकारणातून हद्दपार करणार असे जाहीर करतो. असा इशारा अ