चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले.
पनवेल (प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणाची नामांकित संस्था असलेल्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय अर्थात सीकेटी कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिक भरत ठाकूर यांनी पाच लाख रुपये तर राज संजय पाटील यांनी ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान माजी विद्यार्थी संघासाठी दिले. शिक्षणासोबत सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सीकेटी कॉलेज उत्कृष्टपणे काम करीत आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्य बजावत आहेत. आपण ज्या संस्थेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्या महाविद्यालयाच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रतीक ठाकूर व राज पाटील यांनी आपले आर्थिक योगदान दिले. सदरचा धनादेश त्यांनी प्राचार्य एस. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. प्रतिक भरत ठाकूर यांनी २०१२ मध्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतील व्यवस्थापन अध्ययन (बी.एम. एस.) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण करून उद्योजकता क्षेत्रात आपले कार्य आणि कर्तुत्व सिद्ध केले आहे. तर राज पाटील यांनी २०११ मध्ये टीवायबीए (इतिहास) शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत