धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.. -- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले
नियमबाह्य पद्धतीने दर्गा तोडण्याची नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना सय्यद अकबर यांनी घेतले फैलावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.. -- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले दर्गा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. महाराष्ट्रात अशी शेकडो उदाहरणे आहेत जिथे हिंदू धर्मियांनी प्रथम संदल आणल्याशिवाय दर्ग्यातील उत्सवांना सुरुवात होत नाही. थोडक्यात येथील उत्सवांमध्ये पहिली पूजा करण्याचा मान हा हिंदू धर्मीय बांधवांचा असतो. मिरज येथील हजरत ख्वाजा शमना मिरा बाबा दर्गा, नागपूर मधील ताजुद्दीन बाबा दर्गा, पनवेल परिसरातील तक्का येथे असणारा जमाल शहा बाबा यांचा दर्गा आणि पनवेलच्या टपाल नाका येथे असणारा हजरत अली सिद्धी बादशहा दर्गा ही अशी काही उदाहरणे आहेत जिथे दर्ग्यात उत्सवाच्या वेळेला प्रथम पूजनाचा मान हा हिंदू धर्मियांचा असतो. मुंबई / प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे चौक येथे सुमारे ३०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून असणारा हजरत सय्यद बालेशहा दर्गा शरीफ तोडण्याची नोटीस नुकतीच पाठवण्यात आली.मीरा भाईंदर