प्रामाणिकपणे जनतेचे कार्य करणारा आदर्श सरपंच मंगेश शेलार यांना झी २४ तासचा आदर्श सरपंच पुरस्कार
# प्रामाणिकपणे जनतेचे कार्य करणारा आदर्श सरपंच मंगेश शेलार यांना झी २४ तासचा आदर्श सरपंच पुरस्कार # अनेक वर्षांपासून दीड लाख लोकसंख्या असलेल्या करंजाडे मधे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता, मात्र सरपंच झाल्यापासून पाठपुरावा करून नवीन पाईप लाईनचे जोरदार काम केल्यामुळे मुळे आज कारंजाडे कर समाधानी आहेत. # हा पुरस्कार म्हणजे प्रामाणिक पणे काम करणाऱ्या व्यक्तीशी न्याय देणारा पुरस्कार होय, अशी चर्चा सध्या पनवेलमध्ये होताना दिसत आहे. पनवेल (रायगड मत) मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज उपयोगी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.झी २४ तासचा पुरस्कार हा राज्यातील उत्कृष्ट सरपंचांना दिला झी २४ तास न्युज च्या वतीने "विकास महाराष्ट्राचा, आवाज रायगडचा" पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण