Posts

Showing posts from February 29, 2024

सामाजिक सभागृह व जल जिवन मिशन योजना यांचे लोकार्पण

Image
सामाजिक सभागृह व जल जिवन मिशन योजना यांचे लोकार्पण श्रीवर्धन / राजू रिकामे रविवारी यादव गवळी समाज विकास मंडळ सायगाव, येथे यादव गवळी समाज सभागृह व जल जिवन मिशन योजना सायगाव - गौळवाडी चे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुका असो वा विधानसभा निवडणुका. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार येणार आहे, देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हेच होतील व केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. असा विश्वास खा. सुनील तटकरे यांनी सायगांव येथील जलजीवन मिशन योजना व सामाजिक सभागृह लोकार्पण दरम्यान व्यक्त केला.       तटकरे यांनी कर्तव्यपूर्तीचे समाधान एखाद्या कामाची पूर्तता झाल्यावर मिळते असे सांगीतले. य पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा व सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला याचा मला आनंद होत आहे.. नदीचा प्रवाह बंदिस्त करत पाण्याची योजना उत्तम प्रकारे राबवण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत असताना आदिती तटकरे या पालकमंत्री असतांना त्यावेळी सायगांव येथील जलजीवन मिशन योजने

रायगडची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवारी 3 मार्च रोजी होणार...

# पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड # रायगडची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा रविवारी 3 मार्च रोजी होणार... पनवेल (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नवोदित,सीनिअर,मास्टर( पुरुष आणि महिला) या    स्पर्धा रविवार दिनांक ०३/०३/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ही भैरवी मंगल कार्यालय, मुळगाव श्रीराम नगर, जुना मुंबई पुणे हायवे, वॉटसिला कंपनी जवळ,खोपोली, जिल्हा - रायगड"येथे होणार आहे तरी या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी याची नोंद घ्यावी आणि वजनासाठी वेळेवर म्हणजे सकाळी ०९.ते ९.३० या वेळेत.हजर राहणे अपेक्षित आहे.     तरी व्यायाम शाळा/जिम /हेल्थ क्लब संचालक व्यवस्थापक प्रशिक्षक यांनी संबंधित खेळाडूंना योग्य त्या सूचना द्याव्यात. स्पर्धेसाठी गोल गळा बनियन (जिम चे नावाचे असावे), कॉस्च्युम, पायामध्ये शूज, कमरेचा पट्टा अशा प्रकारचा गणवेश असणे आवश्यक आहे.     मास्टर गटातील खेळाडूंनी वयाचा मूळ पुरावा झेरॉक्स कॉपी सह आणणे आवश्यक आहे.      सदर जिल्हास्तरीय स्पर्धेतून राज्यस्पर्धात संघ पाटविला जाणार आहे. याबाबत नोंद घ्यावी.    *तसेच जे स्पर्धक दुहेरी स्पर्धेत भ